मोठ्या लोकांचे मोठे सोहळे...

 मोठ्या लोकांचे मोठे सोहळे..


सीएम साहेब निवडणूक अर्ज भरायला 4 चाकी मधून (त्यांचा नावावर एकपण गाडी नाही! तो विषय वेगळा) जाऊदेत ओ... पण गाडीत माणसे किती 4 ( 2 व्यक्ती नियम रद्द झाला वाटतं?) 

आम्ही बाजाराला एकानेच जायचं....

आत्ता बायकोला बाजारात न्यायची काय गरज आहे, लॉकडाऊन आहे, कोरोनचा संकट आहे, काय मिळेल ते घेऊन या आणि दिवस काढा.


पण आमचा निवडणूक अर्ज भरायला....!

आम्ही सहकुटुंब सहपरिवार जाणार...

आमचा मुलगा आमदार आहे, मी स्वतः दस्तुरखुद्द आपल्या प्रदेशाचा मुख्यमंत्री आहे.

मीच नियम बनवतो..

(मग आम्हीच ते धाब्यावर बसवू शकतो)

आम्ही आमचा कार मधून पेशंट ला दवाखान्यात नेताना गावातले चौकीदार आम्हाला शिकवतात... 

"तुम्हाला नवीन नियम माहीत नाही काय."

अरे पण कर मध्ये पेशंटची काळजी घ्यायला मागच्या सीट वर कोणी नको काय?


आता असं तुम्ही उलट बोलला की मग....

मग काय

त्यांचा श्रीमुखातून त्यांचा श्रीमुखातून कित्येक मुक्ताफळे पडतात, कानाला मंत्रमुग्ध करणारी


थोडक्यात काय,

आमच्यासाठी नियम...

आणि हे लोक.. मोठी माणसं

जपून रे बाबांनो...

हेच आहेत...


मोठ्या लोकांचे मोठे सोहळे..

Comments

Popular posts from this blog

सोशल डीस्टसिंग

तिसरे महायुद्ध