Posts

Showing posts from October, 2024

मोठ्या लोकांचे मोठे सोहळे...

 मोठ्या लोकांचे मोठे सोहळे.. सीएम साहेब निवडणूक अर्ज भरायला 4 चाकी मधून (त्यांचा नावावर एकपण गाडी नाही! तो विषय वेगळा) जाऊदेत ओ... पण गाडीत माणसे किती 4 ( 2 व्यक्ती नियम रद्द झाला वाटतं?)  आम्ही बाजाराला एकानेच जायचं.... आत्ता बायकोला बाजारात न्यायची काय गरज आहे, लॉकडाऊन आहे, कोरोनचा संकट आहे, काय मिळेल ते घेऊन या आणि दिवस काढा. पण आमचा निवडणूक अर्ज भरायला....! आम्ही सहकुटुंब सहपरिवार जाणार... आमचा मुलगा आमदार आहे, मी स्वतः दस्तुरखुद्द आपल्या प्रदेशाचा मुख्यमंत्री आहे. मीच नियम बनवतो.. (मग आम्हीच ते धाब्यावर बसवू शकतो) आम्ही आमचा कार मधून पेशंट ला दवाखान्यात नेताना गावातले चौकीदार आम्हाला शिकवतात...  "तुम्हाला नवीन नियम माहीत नाही काय." अरे पण कर मध्ये पेशंटची काळजी घ्यायला मागच्या सीट वर कोणी नको काय? आता असं तुम्ही उलट बोलला की मग.... मग काय त्यांचा श्रीमुखातून त्यांचा श्रीमुखातून कित्येक मुक्ताफळे पडतात, कानाला मंत्रमुग्ध करणारी थोडक्यात काय, आमच्यासाठी नियम... आणि हे लोक.. मोठी माणसं जपून रे बाबांनो... हेच आहेत... मोठ्या लोकांचे मोठे सोहळे..

सोशल डीस्टसिंग

नमस्कार गडहिंग्लजकरांनो मी आपलाच एक गडहिंग्लजकर. आपण 3 दिवस नगरपालिकेच्या सांगण्या वरून चांगला बंद पाळला. उत्तम प्रतिसाद होता. आपली काळजी आपणच घेतली पाहिजे. नगराध्यक्षा मॅडमच्या काळजीवाहू आदेश आपण पाळला. पण मित्रांनो कालच्या 4 तासाच्या बाजारा मध्ये आपण त्याची ऐसी तैसी केली आणि आपले 3 दिवस मातीत मिसळले. आता चुकलं कुठं?  हा प्रश्न सगळ्यांनाच आहे. काही गोष्टी आपल्या चुकल्या, काही गोष्टी नगरपालिकेच्या नियोजनात चुकल्या. 3 दिवसाच्या बंद मध्ये आपल्या घरातील भाजीपाला, जीवनावश्यक वस्तू संपत आल्या, काही संपल्या सुद्धा. पुढचे तीन दिवस काढायचे म्हणाल्यावर आपण लगबगीने बाजाराला गेलो. पण मित्रांनो आपल्याला नगराध्यक्षांनी एवढं कळकळीने सांगितले होते, "सोशल डीस्टसिंग" पाळून सर्व बाजार करायला सांगितले होते, पण आपल्याला तेवढा धीर कुठं आहे, कुठे तर 3 दिवस नाही.. 3 महिने बंद असल्या सारखे गर्दी केली. दुसरा माझा एक वैयक्तिक विचार, जर हा बाजारचा वेळ 4 ते 8 ऐवजी,  11 ते 5 चालला नसता का? म्हणजे ज्याला वेळ मिळेल तसे लोक आले असते आणि गर्दी झाली नसती. एक छोटंसं उदाहरण देतो, सकाळी आई ने सांगितले की, आजचे ...

तिसरे महायुद्ध

काय करायचं आहे ते करून घ्या खूप कमी दिवस शिल्लक राहिलेत... तिसरे महायुध्द होण्याचे 99% शक्यता आहे.. कुणाच्याही मनात काहीही असेल तर ना वेळ दौडता पटकन बोलून टाका नाहीतर... तेव्हाच बोललो असतो तर बरं झालं असतं असा विचार ही करता येणार नाही... अन् हा विचार करताना तुमचा जवळ फक्त २-४ मिनिटं राहिली असतील... तेव्हा असाल तुम्ही कोणत्या तरी मातीचा कीव्हा मोठ्या इमारतीच्या ढिगाऱ्यखाली... हाताने माती बाजूला सारावी तर हाथ मोडलेत उठून चालव तर पायच नाहीत...  अन् डोळे उघडून निळ्याभोर आकाशाला तरी पहावं.., तर प्रकाशाच्या तीव्रतेने डोळे गेले असतील आणि जरी राहिले असले डोळे शिल्लक तर नीळे आकाश निरभ्र नसेल, धूळ आणि धुराने ओसंडून गेले असेल... अणु बॉम्ब पडल्या वर राख पण मिळत नाही पण यदा कदाचित शिल्लक राहिला तर... . तेव्हा तुमचा मनात खूप काही येईल पण करता काहीच येणार नाही... काय शिल्लक असेल तर फक्त श्वास असेल चालू अन् काय नाही... म्हणून तुमचा एक चांगला मित्र या नात्यानं सांगतोय बोलून टाका काय असेल ते कोणतीही फिकीर न बाळगता...  भावा/ बहीण/ मित्र/ मैत्रीण सोबत भांडण असेल तर जा आणि मारा त्याला मिठी आणि व्ह...