सोशल डीस्टसिंग
नमस्कार गडहिंग्लजकरांनो
मी आपलाच एक गडहिंग्लजकर.
आपण 3 दिवस नगरपालिकेच्या सांगण्या वरून चांगला बंद पाळला. उत्तम प्रतिसाद होता. आपली काळजी आपणच घेतली पाहिजे. नगराध्यक्षा मॅडमच्या काळजीवाहू आदेश आपण पाळला.
पण मित्रांनो कालच्या 4 तासाच्या बाजारा मध्ये आपण त्याची ऐसी तैसी केली आणि आपले 3 दिवस मातीत मिसळले.
आता चुकलं कुठं?
हा प्रश्न सगळ्यांनाच आहे.
काही गोष्टी आपल्या चुकल्या, काही गोष्टी नगरपालिकेच्या नियोजनात चुकल्या.
3 दिवसाच्या बंद मध्ये आपल्या घरातील भाजीपाला, जीवनावश्यक वस्तू संपत आल्या, काही संपल्या सुद्धा. पुढचे तीन दिवस काढायचे म्हणाल्यावर आपण लगबगीने बाजाराला गेलो. पण मित्रांनो आपल्याला नगराध्यक्षांनी एवढं कळकळीने सांगितले होते, "सोशल डीस्टसिंग" पाळून सर्व बाजार करायला सांगितले होते, पण आपल्याला तेवढा धीर कुठं आहे, कुठे तर 3 दिवस नाही.. 3 महिने बंद असल्या सारखे गर्दी केली.
दुसरा माझा एक वैयक्तिक विचार,
जर हा बाजारचा वेळ 4 ते 8 ऐवजी,
11 ते 5 चालला नसता का?
म्हणजे ज्याला वेळ मिळेल तसे लोक आले असते आणि गर्दी झाली नसती.
एक छोटंसं उदाहरण देतो,
सकाळी आई ने सांगितले की, आजचे दुपारचे जेवण सगळ्यांनी 12 ते 12.30 मध्येच करायचे आणि कोण नंतर येईल त्याला जेवण मिळणार नाही. मग सगळे जमले 12 ला च
आमचं घर आहे छोटं, अन् माणस 7
मग काय झाली की गर्दी जेवण खोलीत.
त्या ऐवजी आई म्हणाली असती, ज्याला भूक लागेल तेव्हा आपलं आपलं जेवण घेऊन जेवा.
मग एकाच वेळी जेवण खोलीत गर्दी झाली नसती.
हाच सेम फॉर्म्युला आपल्या गडहिंग्लज मध्ये काल वापरला असता तर.?
हा मेसेज गडहिंग्लज मध्ये फिरेल नाही फिरेल माहिती नाही.
पण ह्या मेसेज मधून आणि एक विनंती आहे नगरपालिकेला,
की आपल्या गडहिंग्लज मधील सर्व दुकाने उघडली नाहीयेत, तरी बाजारपेठेतील वॉर्डच्या लोकप्रतिनिधींनी त्या त्या दुकानदारांना संपर्क करून दुकान उघडण्यास विनंती करावी. यामुळे जी मोजकी दुकाने उघडली, तिथे खूपच गर्दी जमली. जर सगळी दुकाने उघडली तर या गर्दीचे विकेंद्रीकरण होईल व नियोजन करण्यास बरे पडेल. आणि आपलं
"सोशल डीस्टसिंग" ही फॉलो होईल
Comments
Post a Comment